सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे हिंदुत्ववादी नेते म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. यामुळे त्यांच्या पश्चात देखील त्यांचे नाव कीर्ती सर्वत्र अमर असल्याचे प्रतिपादन चांदवड- देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. ते देवळा येथे आज (दि.२३) रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
Dada Bhuse | शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची देवळा तालुक्यातील शाळांना अचानक भेट
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देवळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील, नगरसेवक अशोक आहेर, भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष किशोर आहेर, माजी उपसरपंच सुनील जाधव, विजय गुंजाळ, जितेंद्र पवार, शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, शहर प्रमुख नाजीम तांबोळी, पवन अहिरराव, विजय आहेर, तुषार गुंजाळ, शांताराम आहेर, दिनकर देवरे, पवन गांगुर्डे, पंकज गांगुर्डे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम