सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील जिजामाता कन्या विद्यालयात मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत शिक्षण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी- मार्च २ मध्ये घेण्यात येणाऱ्या १० वी परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ व विद्यार्थिनींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. विद्यालयाचे पर्यवेक्षक के. एम खोंडे यांनी परीक्षा पद्धती, गुणदान योजना या विषयी तर एस. टी. पाटील यांनी कॉपीमुक्त अभियान, मंडळ शिक्षा सूची, परीक्षा काळात घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
Deola | देवळा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तसेच उच्च यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. एल. एस. करवंदे यांनी अंतर्गत मूल्यमापन व वेळापत्रक याची माहिती दिली. पालक संघाचे सदस्य समाधान आहेर यांनी कॉपी सारख्या गैरप्रकरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पालक संघाचे उपाध्यक्ष सतीश गुंजाळ, सहसचिव महेंद्र आहेर यांसह पालक, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन एस. एन आहेर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम