Deola | चिंचवे (नि.) विकास सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड

0
30
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चिंचवे (नि.) विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश मुरलीधर पवार यांची तर व्हा. चेअरमन पदी वैजयंताबाई संजय गायकवाड यांची शुक्रवारी (दि.२०) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. चिंचवे विकास सोसायटीचे मावळते चेअरमन विश्वास वाघ, व्हा. चेअरमन रविंद्र पवार यांनी आवर्तन पद्धती नुसार राजीनामा दिल्याने या रिक्त जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शुक्रवारी (दि.२०) रोजी दुपारी १२ वाजता सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली देवळा येथील सहाय्यक निंबधक कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.

Deola | रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवड बिनविरोध

यावेळी चेअरमन पदासाठी प्रकाश पवार व व्हा. चेअरमन पदासाठी वैजनताबाई गायकवाड यांचा निर्धारित वेळेत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने यावेळी त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी चेअरमन विश्वास वाघ, व्हा. चेअरमन रविंद्र पवार, संचालक गणेश गांगुर्डे, रवींद्र पवार, सुभाष मोरे, सचिन पवार, सतिष पवार, समाधान गांगुर्डे, विलास वाघ, लिलाबाई कदम, निंबा पवार, रामभाऊ पवार, भाऊराव पगारे, नानाजी मोरे, सुरेश पवार, सचिव सुधाकर चव्हाण आदींसह सभासद, समर्थक उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व गुलालाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here