Vidhansabha 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीने राज्यामध्ये सर्वांचीच लक्ष वेधून घेतले असून लोकसभे मिळालेल्या कॉन्फिडन्स घेऊन महाविकास आघाडी आता विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली असून याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये 60% जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आजवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेने विरुद्ध लढली होती. परंतु 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हा आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार? हा मोठा प्रश्न होता. तसेच लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही अनेक मतदारसंघांमध्ये ‘सांगली पॅटर्नची’ भीती होती. मात्र बऱ्याच जागांवरती महाविकास आघाडीने आता तोडगा काढल्याचे सांगितले जात आहे.
Assembly Election | ‘महायुतीत 70 टक्के…’; जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे मोठे विधान
काय आहे ‘मविआ’चा जागावाटप फॉर्म्युला?
राज्यामध्ये एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील 100 जागा काँग्रेस, 100 जागा शिवसेना ठाकरे गट तर 84 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष लढवणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लोकसभेमध्ये एकही जागा देण्यात आली नव्हती. पण विधानसभेमध्ये त्यांचा विचार करण्यात आला असून चार जागा सोडण्याची तयारी महाविकास आघाडीने दर्शवल्याचे सांगण्यात येते आहे. काही जागांवरील तिडा अद्यापही कायम असून तो लवकरच सोडवला जाणार आहे.
इतक्या जागांवर एकमत?
मविआच्या तीनही पक्षांमध्ये 120 ते 130 जागांवर एकमत असल्याचे बोलले जात आहे. तर तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा त्याच पक्षाला दिल्या आहेत अशी माहिती आहे. तर दहा ते वीस जागांवर अदलाबदल केली जाणार असल्याचे सांगितले जाते आहे.
Assembly Election | विधानसभेत वंचितचा ‘या’ पक्षाला पाठिंबा!; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
या भागातील जागा वाटपाबाबत चर्चा संपन्न
महाविकास आघाडीकडून विदर्भ सोडून मुंबई, कोकण, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जागांवर या तीन दिवस झालेल्या बैठकीत चर्चा पार पडली. त्याचप्रमाणे तीढा असलेल्या जागांवर तिन्ही पक्षांकडून एखादी कंपनी नेमून पक्षाची ताकद जाणून घेतली जाणार आहे. पुढील बैठकीत विदर्भातील जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम