सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी कारभारी उत्तम पगार यांची तर व्हा. चेअरमनपदी तुळशीराम केदा मेधने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रामेश्वर विकास सोसायटीचे मावळते चेअरमन आण्णा पगार, व्हा. चेअरमन बाळू पगार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी नूतन पदाधिकाऱ्यांची आज शुक्रवारी (दि.१६) रोजी सहकार अधिकारी दिलीप अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली.
Deola | देवळा येथे महामार्गाच्या कामाविरोधात संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत काम बंद पाडले
यात चेअरमन पदी कारभारी पगार यांची तर व्हा. चेअरमन पदी तुळशीराम मेधने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी मविप्रचे व सोसायटीचे संचालक विजय पगार, मावळते चेअरमन आण्णा पगार, माणिक पगार, बाळू पगार, बाबुराव बागुल, रमण कांदळकर, गोविंद पगार, सुनंदा पगार, मिराबाई पगार, सचिव साहेबराव पवार, शिपाई अशोक खैरनार आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम