Deola | आई-वडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासह इतरही मदत करण्यासाठी पुणे येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने या वर्षाचा मुख्य मदतनिधी वितरण सोहळा २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असल्याची माहिती शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी देवळा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Deola | देवळा येथे दशनाम गोसावी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा
यावेळी त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या मदतीचे हे ११ वे वर्ष असून अशा १२७ मुलांचे पालकत्व या ट्रस्टने स्वीकारलेले आहे. या कार्यक्रमप्रसंगी हास्यजत्रा फेम अभिनेते गौरव मोरे यांना शिवनिश्चल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, प्रसिद्ध उद्योजक दादासाहेब सूर्यवंशी, आमदार डॉ.राहुल आहेर, नाफेडचे संचालक केदा आहेर हे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अनाथ व गरजू मुलांना शालेय व इतर साहित्य देत दत्तक घेण्याचा हा मुख्य कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
Deola | देवळ्यात उमेदवारांपेक्षा तालुक्यातील तीन युवा नेतृत्वांचीच चर्चा
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर हे राहणार असून महारोजगार केंद्राचे संचालक भाऊसाहेब पगार, कळवणचे भूषण पगार, रामेश्वर कृषी मार्केटचे चेअरमन राजेंद्र देवरे, बळीराजा फाउंडेशनचे भाऊसाहेब आहिरे, देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठावदे आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाआधी प्रसिद्ध शाहीर सुरेश जाधव यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. राज्यातील अनाथ मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच मायेचे पांघरून घालण्याच्या उद्देशाने संस्थेने हे कार्य हाती घेतले असल्याचे गोसावी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे डॉ.डी.के.आहेर, डॉ.सुनील आहेर, भगवान आहेर, अनिल भामरे, पंकज जाधव व इतर सदस्य उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम