Deola | कणकापूर ग्रामपंचायतीला भुजल समृद्ध ग्राम स्पर्धेत वीस लाखाचे पारितोषिक

0
14
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत तालुक्यातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कणकापूर ग्रामपंचायतीने विजय मिळवला असून, जिल्हास्तरावर तृतीय क्रमांकाने विजयी झालेल्या या ग्रामपंचायतीला सोमवारी दि. ९ रोजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते 20 लाखाची पुरस्कार रक्कम देण्यात आली. कणकापूर गावाने भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत विजय मिळविल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत १३ जिल्ह्यातील ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. यात जिल्हास्तरावर पहिल्या तीन क्रमाकांना ५० लाख, ३० लाख व २० लाखांचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील कणकापूर ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवून २० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. यावेळी खासदार भास्कर भगरे, पाणी पुरवठा व स्वछता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्त पवणीत कौर, अतिरिक्त संचालक विजय पाखमोडे आदी उपस्थित होते.

Deola | देवळा येथे अभिनेते गौरव मोरे यांच्या उपस्थितीत शिवनिश्चल ट्रस्टच्या वतीने मदतनिधी कार्यक्रम

भूजल व्यवस्थापन अधिक सशक्त करण्यासाठी अटल भूजल योजनेची घोषणा महत्वाची भूमिका बजावत असल्याचे मंत्री दादाजी भुसे म्हणाले. केंद्रशासन व जागतिक बँक यांचे सहभागातून महाराष्ट्रासह देशातील अन्य सात राज्यांमध्ये  राबविण्याची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली. भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत घसरण होत आहे. त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता बाधित होत आहे. याकरीता भूजल पुनर्भरण उपाययोजना जलसंधारणाची कामे आणि त्याचबरोबर पाणी बचतीच्या उपाययोजना करून भूजलाची व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा असून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये समाविष्ट ग्रामपंचायतींमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करतो. “लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन” साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन प्रेरणादायी ठरेल यात शंका नसून येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात गावांनी सहभाग नोंदवून जलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी व्यक्त केली.

Deola | देमको चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रस्तावाला देमको बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी

यावेळी सरपंच सरपंच बारकु वाघ, उपसरपंच जगदीश शिंदे, माजी उपसरपंच अनुराधा जैन, सदस्य गोविंद बर्वे, ग्रामसेविका जयश्री आहेर, प्रकाश शिंदे, हिरामण बछाव, बापू शिंदे, रवी बर्वे, विलास जैन, अशोक शिंदे, मुकेश महाराज बर्वे, दादाजी शिंदे, रमेश सावकार, भाऊसाहेब शिंदे, बाजीराव बकुरे, शिवा बकुरे, संजय शिंदे, योगेश गांगुर्डे, हेमंत जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here