सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | कर्जवसुलीसाठी राजकिय, प्रशासकीय दबावाला बळी न पडता देमको बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाने कर्ज वसुलीचे काम अतिशय तन्मयतेने केले असून, जुनी प्रकरणे निकाली काढत गेल्या दोन वर्षात ठेवींमध्ये तसेच कर्ज वाटपात देखील वाढ झाल्याने ही वार्षिक सर्वसाधारण सभा प्रगतीची असल्याची ग्वाही व्हा. चेअरमन डॉ. प्रशांत निकम यांनी दिली. यापुढेही कर्जवसुलीसाठी तसेच इतर धोरण निश्चित करताना कडक धोरण स्वीकारले जाईल असेही त्यांनी सांगितले.
देमको बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या स्वमालकीच्या मालेगाव रोडवरील जागेत चेअरमन कोमल कोठावदे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरण संपन्न झाली. यावेळी अहवाल वर्षात दिवंगत थोर नेते, सभासद, ठेवीदार आदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच इयत्ता १० वी ९० % व १२ वीत ८५% पेक्षा जास्त गुण मिळविण्याऱ्या सभासद पाल्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आला. सभेत माजी चेअरमन डॉ विश्राम निकम, दिलीप मेतकर, नितीन शेवाळकर, के. एस बच्छाव, सुनील आहेर, पवन अहिरराव, सुधाकर मेतकर, धनंजय आहेर, विनोद शिंदे, एल.एन शिरसाट, बाळासाहेब भांगडिया, शांताराम निकम यांनी चर्चेत भाग घेतला.
Deola | देमको बँकेत महिला अध्यक्ष असल्याने बँक नक्कीच उत्तुंग भरारी घेईल – आ. सीमा हिरे
अहवाल वाचन व्यवस्थापक नितीन बोरसे यांनी केले. संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी विस्तारित नाशिक शाखेबद्दल बोलताना सांगितले की, “नव्याने स्थलांतरित झालेल्या सिडको शाखेत अवख्या वीस दिवसांत ३ कोटी ४० लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, या शाखेने आतापर्यंत १० कोटी रुपयांच्या ठेवींचा पल्ला गाठला आहे व कमी भाड्यात जागा उपलब्ध झाल्याने बँकेची बचत झाली आहे”. सभासदांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी व्हा. चेअरमन डॉ. निकम यांनी देमको चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात यावी. या माध्यमातून भविष्यात सभासदांसाठी विविध योजना राबविण्यात येतील. याविषयाला सभेत सर्वानुमते मंजुरी मिळाली.
याप्रसंगी जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे, संचालक अनिल धामणे, केदारनाथ मेतकर, भगवान बागड, प्रमोद शेवाळकर, योगेश राणे, हेमंत अहिरराव, मयूर मेतकर, अमोल सोनवणे, सुभाष चंदन, मनीषा सीनकार, नलिनी मेतकर, तज्ञ संचालक भारत कोठावदे, ऍड चैतन्य वडनेरे, स्वीकृत संचालक प्रशांत मुसळे आदींसह कौतिक पवार, मंगलचंद जैन, अतुल आहेर, डॉ राजेंद्र ब्राम्हणकार, संजय आहेर, जितेंद्र आहेर, रविंद्र मेतकर, प्रदीप आहेर, राजेंद्र वडनेरे, मनोज आहेर आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा यशस्वीतेसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी,सुनील भालेराव, नाशिक शाखाधिकारी प्रणाली पाटील, हेमंत शेवाळे, आनाजी सोनवणे, राजेश पवार, रोहित धामणे कैलास बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार केदारनाथ मेतकर यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम