सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील तिरुपती व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल रामेश्वर येथे रविवार (दि.१२) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. चिमुकल्यांच्या गीतगायन, नृत्य व नाटिका सादर करत चांगलीच रंगत आणली. गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव हे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सौरभ आहेर व उपप्रचार्या माधुरी देवरे यांनी केले. संस्थापक बंडूनाना आहेर, अध्यक्षा माधुरी आहेर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून आरसीएफचे व्यवस्थापक जगदिश बाविस्कर, मविप्रचे संचालक विजय पगार, अभिनेता मंगेश काकड, नरेंद्र महाले, शिक्षण विस्ताराधिकारी किरण विसावे, केंद्रप्रमुख पी. के. आहेर, तिरुपती संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप सावळे, सचिव डॉ. सुरेश आहेर, डॉ. वंदना आहेर, विश्वनाथ गुंजाळ, सुनिता गुंजाळ, माणिकराव गुंजाळ, वर्षा जाधव उपस्थित होते.
Deola | आहेर महाविद्यालयात भूगोल दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्याविष्कार व इतरही कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आंतरशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी संयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूत्रसंचालन उर्वशी गौर, काव्या पवार, ईश्वरी पवार, सिद्धि खैर, खुशाली जाधव, जागृती बच्छाव, कृष्णा वाघ यांनी केले तर ऋषिकेश देवरे याने आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम