सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | रुवी क्रिकेट क्लब महालपाटणे यांच्या आयोजनाखाली निंबोळा येथील उप बाजार आवाराच्या मैदानात भव्य स्वरूपात “स्वराज्य चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आले. तसेच भारतीय सैन्यदलातील सीआयएसएफ जवान मुकेश आहिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. पहिला सामना प्रतापगड विरुद्ध रायगड यांच्यात खेळला गेला. तर अंतिम सामना पन्हाळा गड आणि राजगड संघांमध्ये रंगला. राजगड संघाने शानदार कामगिरी करत पन्हाळा गड संघावर दणदणीत विजय मिळवत पहिल्या सीझनचे विजेतेपद मिळवले. राजगड संघाचे संघमालक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट खेळ सादर केला. स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 21,000 हजार रुपयांचे बक्षीस दिलीप पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकासाठी 15,000 हजार रुपयांचे बक्षीस आयोजकांमार्फत दिले गेले.
Deola | देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांचा वाढदिवस साजरा
तसेच वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी डोंगरावर येथील माजी सरपंच दयाराम सावंत यांनी 4,000 हजार रुपये आणि प्रवीण राजे यांनी 3,000 हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले. शिवनेरी संघाचे डॉ. आकाश देवरे, प्रतापगड संघाचे शरद ठाकरे, रायगड संघाचे प्रदीप निकम, पन्हाळा गड संघाचे सागर आहिरे, आणि तोरणा संघाचे गणेश निंबाळकर यांनी देखील प्रभावी कामगिरी केली. या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी देवळा बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप लालजी पाटील, सरपंच प्रदीप निकम, गणेश पाटील, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष योगेश आहेर, डॉ. आकाश देवरे, तसेच देवळा तालुक्यातील तरुण क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वराज्य चषकाच्या या यशस्वी आयोजनाबद्दल रुवी क्रिकेट क्लबचे विजय हिरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम