सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथे भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या जनसेवा कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ‘कक्ष’ उभारण्यात आला असून, त्याचे आज शुक्रवारी (दि. ५) रोजी नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. राज्य सरकारने नुकतीच महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली असून, या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचे अर्थ सहाय्य मिळणार आहे. शासनाने योजना घोषित केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी तालुका स्थरावरील सेतू कार्यालयात व गावागावांत असलेल्या ई-सेतू कार्यालयात महिलांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
Deola | प्रशासकीय इमारतीच्या आवारात केदा आहेर यांच्याकडून बाके उपलब्ध करून देण्यात आली
या योजनेसाठी महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या देवळा येथील जनसेवा कार्यालयात कक्ष उभारण्यात आला असून, याठिकाणी आता महिलांना योजनेची माहिती मिळणार व आपला फॉर्मही भरता येणार आहे. याचा शहरातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी केले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज आहेर, माजी नगराध्यक्षा सुलभा आहेर, नगरसेविका शीला आहेर, भारती आहेर, ऐश्वर्या आहेर, राखी भिलोरे, नगरसेवक जितेंद्र आहेर, अशोक आहेर, संतोष शिंदे, संजय आहेर, करण आहेर, नानू आहेर, कैलास पवार, हितेश आहेर आदी उपस्थित होते.
Deola | देवळा तालुक्याला प्रथमच एवढे मोठे पद; केदा आहेर यांचे जल्लोषात स्वागत
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने कुटुंबातील प्रत्येक महिलेला महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. या योजनेचे शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी स्वागत केले आहे. यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असून, याचा महिलांनी लाभ घ्यावा. – सुलभा जितेंद्र आहेर (माजी नगराध्यक्षा, देवळा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम