सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) राबवली जात असून, त्यासाठी गट-तट विसरून लोकप्रतिनिधी, प्रशासन व कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे असे आवाहन चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल आहेर (Mla Rahul Aher) यांनी केले. खर्डे (ता.देवळा) येथे शुक्रवारी (दि.१९) रोजी महालक्ष्मी मंगल कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्जुन मोहन हे होते.
Deola | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा – आ. डॉ. राहुल आहेर
आमदार डॉ.राहुल आहेर व नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकास अधिकारी भरत वेन्दे, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, पंचायत समितीचे माजी सभापती बापू देवरे, उपसरपंच सुनील जाधव विकास सोसायटीचे चेअरमन अनिल देवरे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदिंसह खर्डे गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सहायक आदींसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(Deola)
Deola | नमो चषकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव – आ. राहुल आहेर
यावेळी नाफेडचे संचालक केदा आहेर, गटविकासाधिकारी भरत वेंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या योजनेत सहभागी होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांच्या अडीअडचणी जाणून घेत माहिती देण्यात आली. देवळा तालुक्यातून जवळपास पंचवीस हजार महिलांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी बांधकाम कामगार महामंडळ अंतर्गत कणकापूर येथील राजमाता जिजाऊ बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ३० लाभार्थ्यांना साहित्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश शिंदे यांच्यासह प्रवीण शिंदे, बारकू वाघ, योगेश शिंदे यांनी संयोजन केले. माध्यमिक शिक्षक कैलास चौरे यांनी सूत्रसंचालन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम