देवळा : देवळा ते खर्डे या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून , रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ,या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याची खंत या परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे .
या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी , अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल ,असा इशारा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी एका प्रशिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे . पत्रकाचा आशय असा कि , देवळा खर्डे मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पुढे कणकापूर, शेरी,वार्षी, हनुमंत पाडा व मुलुखवाडी या गावांचा समावेश आहे.
खर्डे गावं परीसरातील बाजारपेठेचे गावं असून, या परीसरातील नागरिकांना बँक तसेच इतर खरेदी विक्री साठी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देवळा शहरात यावे लागते.यामुळे या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अरुंद रस्ता व ठिक ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे ,चाऱ्या यामुळे अपघाताचे देखील प्रमाण वाढले असून, वाहनधारकांना या मार्गावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. देवळा खर्डे रस्ता बरोबरच परिसरातील ईतरही गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून,याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.अनेकदा मागणी करून देखील रस्त्याची कामे पूर्ण होत नाहीत . यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे . याकडे लक्ष केंद्रित व्हावे ,यासाठी प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेवटी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम