सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा ते खर्डे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘पाण्यात खड्डा कि खड्ड्यात पाणी’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून, वाहनधारकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करण्यात येऊन प्रहार स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा खर्डे येथील प्रहारचे पदाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी दिला आहे.
देवळा खर्डे रस्त्यावर प्रशासकीय इमारत आहे. पुढे पश्चिम भागात वाजगाव, वडाळा, खर्डे, कनकापूर, कांचणे, शेरी, वार्शी, मुलुखवाडी, हनुमंतपाडा या गावांचा समावेश आहे. या भागातील नागरिक देवळा येथे बँक तसेच इतर दैनंदिन कामकाजासाठी व विध्यार्थी शाळेत या मार्गावरून ये जा करतात. यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. मात्र या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, रस्त्यावर जागोजागी मोठमोठी खड्डे पडली आहेत.
Deola | देवळा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शिबीर
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्डयांमध्ये पाणी साचले आहे. वाहनधारकांना रस्त्यांवरून मार्गक्रमन करताना तारेवरची कसरत करावी लागत असून पाण्यात खड्डा कि खड्ड्यात पाणी असा संभ्रम पडला आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात दिवसागणिक अपघातदेखील घडत असल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधींनी देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन खड्डे दुरुस्त कारण्याची तरी तसदी घ्यावी अशी मागणी होत असून, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी देवळा खर्डे रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम