सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरातील व परिसरातील तमाम नागरिकांना तालुका प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंमलबजावणी तसेच मार्गदर्शनासाठी गुरुवार (दि.१) ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दुर्गा माता मंदिर सभागृह, बाजारतळ, देवळा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी केले आहे.
Deola | लाडक्या बहीणींची धावपळ कमी होणार; केदा आहेरांच्या जनसेवा कार्यालयात योजनेसाठी विशेष कक्ष
यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर तसेच भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोफत अर्ज वाटप करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याचा महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा पवार व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम