सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | शिवसेनेचे सचिव व संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.३०) रोजी देवळा तालुक्यातील खर्डे, उमराणे व देवळा येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने चांदवड देवळा विधानसभा मतदार संघातील पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच जेष्ठ नागरिकांना छत्र्यांचे देखील यावेळी वाटप करण्यात आले असून, भाऊसाहेब चौधरी यांच्या ह्या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतूक केले.
Deola | देवळा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शिबीर
यावेळी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उप जिल्हाप्रमुख देवानंद वाघ, जितेंद्र पगार, चांदवड तालुका प्रमुख विकास भुजाडे, देवळा तालुकाप्रमुख दीपक निकम, सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव, भाऊसाहेब चव्हाण, योगेश अहिरे, नाजीम तांबोळी, गणेश ढवळे, प्रतीक आहेर, दत्तू मोरे, संदीप पवार, शशिकांत ठाकरे, सचिन गांगुर्डे, प्रकाश कुवर आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम