Deola | केदा आहेरांमुळे पहिल्यांदाच देवळ्याला शेतकरी संघाच्या नेतृत्वाची संधी

0
44
Deola
Deola

Deola |  कळवण आणि देवळा तालुका कार्यक्षेत्र असलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर तर, उपाध्यक्षपदी भाजपचे कळवण येथील शहराध्यक्ष निंबा पगार यांची बिनविरोध निवड झाली. काल संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवडप्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी केदा आहेर आणि उपाध्यक्षपदासाठी निंबा पगार या दोघांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला होता.(Deola)

कळवण आणि देवळा शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे केदा आहेर हे देवळ्यामधील पहिलेच प्रतिनिधी ठरले आहेत. दरम्यान, केदा आहेरांमुळे देवळा तालुक्याला पहिल्यांदाच शेतकरी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आज पर्यंत देवळ्याचे प्रतिनिधी हे उपाध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, देवळ्याचे प्रतिनिधीत्व करताना थेट अध्यक्षपदी विराजमान होण्याचे पहिले मानकरी हे आहेर हे ठरले आहेत.

Spiritual News | देवळा ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात उद्यापासून शाकंभरी पौर्णिमा उत्सव

आजपर्यंत देवळ्यात अनेक राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी होऊन गेली. मात्र, त्यापैकी कोणालाही अध्यक्षपदाची  मजल मारता आली नाही. किंबहूना, कळवणच्या प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसामोर देवळ्याच्या प्रतिनिधींना नमते घ्यावे लागले. मात्र, राजकीय क्षेत्रात सर्वांसोबत सलोख्याचे संबंध ठेवत आणि राजकीय कसब दाखवत केदा आहेर यांनी हे शक्य करून दाखवले. यामुळे पुन्हा एकदा केदा आहेर यांचे प्रभावशाली नेतृत्व अधोरेखित झाले. ही देवळा तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.(Deola)

याआधी केदा आहेर यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, देवळा बाजार समितीचे सभापतीपद तसेच जिल्हा परिषदेचे सभापती पद अशी अनेक मोठमोठी पदं भूषवली असून, आता शेतकरी संघाचा मानही आहेर यांनी देवळ्याला मिळवून दिला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्यावेळी सभागृहात नगराध्यक्ष कौतिक पगार, मविप्रचे संचालक विजय पगार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पगार, संचालक हरिबंद पगार, राजेंद्र पवार, माणिक देवरे, प्रा. सुनील जाधव, बाळासाहेब जाधव, हितेंद्र पगार, शोभा निकम, प्रभा देवरे, संतोष मोरे, अतुल पवार, जितेंद्र आहेर, प्रविण मेधणे, दीपक खैरनार, गोविंद कोकरे, आदी उपस्थित होते.(Deola)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here