सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अभिनव व जनता विद्यालयात ‘व्यास पौर्णिमा’ उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनीष बोरसे होते.तर व्यासपीठावर सुरेश आहेर, विशाल शेवाळे, विनोद शेवाळे गणेश निकम, महेश सूर्यवंशी, पुनम बाविस्कर, योगिता भामरे, शुभांगी बच्छाव, शैला भामरे, मयुरी जाधव, सोनाली मगर, मंजुषा सोनवणे, दिपाली पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी प्रथम साळवे, सानिका देवरे, तेजस दिवटे ,समृद्धी निकम, मयूर सूर्यवंशी, प्रतीक्षा पाटील, ऋतुंबरा गुरुगुडे, स्नेहल पवार, तृप्ती निकम आदि विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेचे महत्व विशद केले. यावेळी विद्यालयातील शिक्षिका पूनम बाविस्कर, सोनाली मगर, सुरेश आहेर यांनी गुरु-शिष्यांचे महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक मनीष बोरसे यांनी जीवनात गुरूंचे स्थान अढळ असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन व आभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी राशी जाधव व जान्हवी जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम