Nashik | जरांगेंनी उपोषणाची नौटंकी थांबवावी; जरांगेंविरोधात ओबीसी समितीच्या गजू घोडकेंचे उपोषण

0
32
Nashik
Nashik

नाशिक :  मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असून, त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके हेदेखील उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, आजपासून त्यांनीही नाशिक येथे आपले उपोषण सुरू केले असून, जरांगेंचे उपोषण सुरू राहील. तोपर्यंत आपलेही उपोषण सुरू असणार, असे त्यांनी जाहीर केले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज पाटील जरांगे यांना शह देण्यास नाशकात गोल्फ क्लब मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकजवळ उपोषणास बसलेले ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. उठ-सूट उपोषण करण्याची नौटंकी जरांगे पाटील यांनी थांबवावी आणि त्यांनी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू नये अशी आपली प्रमुख मागणी असल्याचे गजू घोडके यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळ ओबीसी १२ बलुतेदार यांचे ‘ओबीसी राजे’

जरांगे पाटलांवर कारवाईचा बडगा का उचलत नाही..?

मनोज जरांगे पाटील आता ओबीसी आणि अन्य नेत्यांबाबत अगदी गलिच्छ विधाने करीत असून त्यांना त्यापासून रोखण्याची खरी गरज आहे. अन्य कुणी असे बरळले असते तर पोलिस यंत्रणेने त्याच्या विरोधात कडक कारवाई केली असती. परंतु जरांगे पाटलांवर कुणी कारवाईचा बडगा का उचलत नाही..? हा आमचा खरा सवाल आहे. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्याबद्दल तर ते रोज गलिच्छ भाषेत बोलत असतात.

प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलतांनाही त्यांची जीभ घसरली होती. गिरीश महाजन यांच्याबाबतही त्यांनी गरळ ओकली आहे. त्यांची अशी शिवराळ भाषा कुणी आणि का खपवून घ्यायची आणि सरकार त्यांचे लाड का पुरवत आहे..? हा खरा सवाल आहे. जरांगे पाटील जितके दिवस उपोषण करतील. तोपर्यंत आपलेही उपोषण सुरू राहील असेही गजू घोडके यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal | भुजबळांना उमेदवारी न देणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा जाहीर निषेध

Chhagan Bhujbal | सरकार त्यांचे लाड का पुरवते हा संशोधनाचा विषय

दादागिरी करून ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने सरकारवर सातत्याने दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सरकारही त्यांचे लाड का पुरवते हा एक संशोधनाचाच विषय आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा सरकारने केल्यानंतर मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण जाहीर झाले. मात्र त्यानंतर सगेसोयऱ्यासह विविध मुद्दे उपस्थित करून जरांगे पाटील सातत्याने सरकारला ब्लॅकमेल करून उपोषणाचा पवित्र अवलंबित आहेत. आता तर आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे.

राजकारणात ओबीसींच्या सर्व जागांवर मराठा समाजाचे लोक निवडून येतात. हा ओबीसी समाजावर एक प्रकारे अन्याय नाही का? त्याविरुद्ध आवाज उठवला की धमकवायचे असेच जरांगे पाटलांचे धोरण राहिले आहे. जरांगे पाटलांना एकदाचे काय हवे ते देऊन टाका आणि हा प्रश्न एकदाचा कायमस्वरूपी मिटवा. जेणेकरून जरांगे पाटलांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा खोचक टोलाही गजू घोडके यांनी लगावला. तुम्ही सहा कोटी असले तरी आम्ही एकटे तुमच्याशी लढायला तयार आहोत, असे घोडके यांनी पत्रकात सांगितले. तर, ओबीसींचे न्याय हक्क अबाधित रहावेत आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनास जशास तसे उत्तर देण्यासाठी उपोषण करत असल्याचे गजू घोडके यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here