Skip to content

देवळा ; १३ ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर


देवळा ; ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाने, भूऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या गावातील ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्या आज दि 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, सदर याद्या या संबंधित ग्रामपंचायतचे तलाठी यांचेकडे पाहणीसाठी उपलब्ध आहेत.

सदर यादीवर कोणाला हरकत किंवा सूचना असेल तर दि 13 ऑक्टोबर 2022 ते दि 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत तहसिल कार्यालय देवळा येथे हरकती व सूचना दाखल करू शकतात. प्रभाग निहाय याची अंतिम मतदार यादी दि 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे . अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!