देवळा ग्रामीण रूग्णालयात सर्पदंश झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे प्राण वाचले

0
1
देवळा ; सर्पदंश होऊन प्राण वाचलेली वैशाली गेल्या रविवारी बोहल्यावर चढली (छाया - सोमनाथ जगताप)

देवळा | सोमनाथ जगताप
देवळा ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ गणेश कांबळे यांनी सर्पदंश झालेल्या २१ वर्षीय तरुणीला वेळेवर योग्य औषधोपचार केल्यामुळे तिचा प्राण वाचला .व सदर तरुणीचे रविवारी दि २३ रोजी अक्षय तृतीया च्या दिवशी लग्न देखील झाले .

देवळा ; सर्पदंश होऊन प्राण वाचलेली वैशाली गेल्या रविवारी
बोहल्यावर चढली (छाया – सोमनाथ जगताप)

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीनुसार सदर तरुणीला डॉ कांबळे देव माणूस भेटला असेच म्हणावे लागेल . याबात सविस्तर वृत्त असे की ,बुधवार दि १९ रोजी कु.वैशाली गायकवाड वय 21 वर्षे( रा. विरगाव) ही विठेवाडी ता देवळा येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत निकम यांचे कडे मजूर म्हणून कामाला आली होती.तिला बुधवार दि १९ रोजी विषारी सर्प चावल्याने येथील डॉ संजय निकम यांच्याकडे नातेवाईकांनी उपचारासाठी दाखल केले होते. सदर रुग्णाच्या डोळ्यावर झापड व चक्कर येत होते.

देवळा ग्रामीण रूग्णालयात सर्पदंश झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे प्राण वाचले

यासंदर्भात डॉ निकम यांनी देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे यांचेशी संपर्क साधून रुग्णाला देवळा ग्रामीण रुग्णालयात येथे पाठवले. डॉ कांबळे यांनी सदर मुलीला विषारी सर्प चावल्याचे सर्व लक्षण दिसून आल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केले .यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेला वैशालीचे रक्ताची बॅग व मास्क आणि ऑक्सीजन लावून कृत्रिम श्वसन चालू केले . त्यानंतर रुग्णाची श्वसन यंत्रणा चालू झाली व बीपी आणि नाडी ठीक झाली. त्यानंतर वैशाली ला स्वतः डॉ कांबळे यांनी मालेगाव सिव्हिल हॉस्पिटला पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दि.२० रोजी वैशाली बाबत बाबत विचारपूस केली असता ती बरी झाल्याचे समजले.

उदयकुमारांचे तालुक्यातील राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे, बघा सविस्तर मुलाखत

यामुळे डॉ गणेश कांबळे यांनी वेळेवर योग्य औषधोपचार केल्यामुळे पेशंट पूर्णपणे बरा झाला. म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी अशी घटना सबंधित मुलीबाबत घडली आहे. यामुळे डॉ कांबळे यांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here