सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | तालुक्यात दिवसेंदिवस छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, आता भुरट्या चोरांनी चक्क वाखारवाडी (श्रीरामपूर) येथील जि.प च्या प्राथमिक शाळेतील पाण्याची टाकी चोरून नेली असून, या घटनेबाबत गुरुवारी (दि. ७) रोजी शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षांनी देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच प्रमाणे खामखेडासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी पुरवठा करणाऱ्या शेती पंपाच्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीला जाण्याचे सत्रही थांबत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पोलिसांनी याची चौकशी करून केबल चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी केली आहे.(Deola)
Deola | देवळा येथे मटका अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
गेल्या काही दिवसांपासून खामखेडासह परिसरात कृषी पंपाच्या केबल चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. बुधवारी (दि. ६) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या गिरणा नदी काठी असलेल्या विहिरीच्या मोटारीच्या केबलची जोडणी खंडित करून चोरटे चोरून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतांना याचवेळी याठिकाणाहुन जाणाऱ्या मजूराला संशय आल्याने त्याने याची माहिती सरपंच वैभव पवार यांना दिली याचवेळी त्यांनी वकील शेवाळे आणि निखिल शेवाळे यांच्याबरोबर नदीकिनारी असणाऱ्या पुलाजवळ जाऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे पसार झाले होते. परंतु चोरीला जाणाऱ्या लाखो रुपयांच्या केबल वाचविण्यात यश आले आहे. १५ ते २० शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करून केबल चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि मिळून आलेल्या सर्व केबल शेतकऱ्यांना देण्यात आल्या.(Deola)
Deola | आकडे व विजसमस्या मुक्त” माळवाडी गावात लाईनमन दिवस साजरा
सध्या खामखेडासह परिसरात शेतीपंपाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, शेतकऱ्यांच्या या सामग्रीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. उन्हाची वाढती तीव्रता, पिकांची पाण्याची गरज भागविताना होणारी दमछाक व चोरीची घटना यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोर चोरी करीत होत आहेत. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबर चोरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे बनले आहे.
– वैभव पवार (लोकनियुक्त सरपंच, खामखेडा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम