Skip to content

धाडशी निर्णय घेतल्या शिवाय जीवनात यशाचा मार्ग सापडत नाही


देवळा : विध्यार्थी जगतात मेहनत केल्यास त्याचे फळ निश्चित मिळते. शालेय जीवनात विविध स्पर्धात सहभागी होण्याचे कधी टाळले नाही . धाडशी निर्णय घेतल्या शिवाय जीवनात यशाचा मार्ग सापडत नाही . असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व अभिनेते राजेंद्र उगले यांनी आज येथे केले. देवळा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कवी व अभिनेते राजेंद्र उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते .

देवळा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना कवी राजेंद्र उगले व्यासपीठावर प्राचार्य हितेंद्र आहेर ,उपप्राचार्य बी.के. रौंदळ आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर हे होते .देवळा महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी, अभिनेते राजेंद्र उगले यांच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त विध्यार्थ्यांना परितोषक वितरण करण्यात आले. उपप्राचार्य बी.के. रौंदळ यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथीचा सत्कार स्वागत.प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणास आपल्याला येणाऱ्या वर्षात सामोरे जावे लागणार आहे . तसेच नवीन शैक्षणिक धोरणास सजग असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्राचार्य आहेर यांनी केले. प्राध्यापक अमित बोरसे यांनी शैक्षणिक व सांस्कृतिक अहवालाचे वाचन केले. उपप्राचार्य पी.एन.ठाकरे यांनि क्रीडा विभागाचा अहवाल सादर केला.

याप्रसंगी कवी उगले यांनी लिहिलेल्या अनेक कविताचे सुंदर सादरीकरण करून विध्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले . प्रा.डॉ डी के आहेर,डॉ विलास वाहूळे, डॉ जयवंत भदाणे, डॉ दीपिका शिंदे,डॉ राकेश घोडे,प्रा बदल लाड,दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी संचलन करणारी एन सी सी छात्र लक्ष्मी पवार,आदर्श शिक्षकेतर कर्मचारी दिनेश वाघमारे, बाबाजी आहेर यांचा देखील विशेष कामगिरी बद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपप्राचार्य व्ही. एम.जोशी यांनी आभार मानले तर डॉ.जयमाला चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले . या प्रसंगी संस्थेच्या प्रशासनाधिकारी डॉ मालती आहेर ,सेवानिवृत्त प्रा डॉ एकनाथ पगार ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!