Skip to content

दहिवड येथील तरुणाचा अपघाती मृत्यू


देवळा : देवळा-मालेगाव रस्त्यावर बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दहिवड येथील ३२ वर्षीय तरुण ठार झाला . या घटनेमुळे दहिवड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून ,गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

याबात देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , आज शुक्रवारी दि (३०) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एसटी बस क्रमांक( एमएच ४० वाय ५६६० )ही देवळ्याहून मालेगाव च्या दिशेने जात असतांना देवळा नजीक वीज उपकेंद्रा जवळ ऍक्टिवा दुचाकीला वाचविण्याच्या नादात एसटी बसने दहिवडहून देवळ्याकडे जाणाऱ्या पल्सर दुचाकी क्रमांक( एमएच ४१ बीसी १४२७ ) ला जोरदार धडक दिली.

यात पल्सर दुचाकी बसच्या पढच्या चाकात घुसल्याने दुचाकीस्वार नितीन शांताराम देवरे (वय ३२, रा. दहिवड ता देवळा ) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ मालेगाव येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नितीनच्या मृत्यूची वार्ता कळताच आई-वडीलांनी हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. गेल्या दोन महिन्यात याच रस्त्यावर दहिवड गावातील तीन तरुणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावा ,अशीं मागणी करण्यात आली असून, देवळा पोलिसांत मोटर अपघात दाखल असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे करीत आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!