कारगिल दिनानिमित्ताने देवळा बाजार समितीच्या वतीने आजी माजी सैनिकांचा सत्कार

0
12
देवळा / कारगिल दिनानिमित्ताने बाजार समितीच्या वतीने वृक्षारोपण करताना आजी माजी सैनिक समवेत सभापती योगेश आहेर ,गटनेते संजय आहेर ,संचालक भाऊसाहेब पगार आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : कारगील दिनाचे औचित्य साधून आजी माजी सैनिकांच्या हस्ते येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दि २६ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. व आजी माजी सैनीकांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला . देवळा बाजार समितीच्या वतीने कारगिल दिन साजरा करण्यात आला .

देवळा कारगिल दिनानिमित्ताने बाजार समितीच्या वतीने वृक्षारोपण करताना आजी माजी सैनिक समवेत सभापती योगेश आहेर गटनेते संजय आहेर संचालक भाऊसाहेब पगार आदी छाया सोमनाथ जगताप

यावेळी आजी माजी सैनिक मांगु लोखण्डे , कैलास पगार ,पंडित आहेर ,रोषण आहेर , महेंद्र आहेर , संदीप आहेर , प्रवीण बोरसे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती योगेश आहेर , गटनेते संजय आहेर . सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील आदींसह संचालक भाऊसाहेब पगार , विजय सोनवणे ,शाहू शिरसाठ , काकाजी शिंदे ,अभिजित निकम , अनिल आहेर , नगरसेवक संतोष शिंदे , सचिन सूर्यवंशी , दिलीप आहेर , राजेंद्र आहेर , सचिव माणिक निकम व शेतकरी ,कर्मचारी उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here