Skip to content

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची सदस्यांना शिवीगाळ; महिला सदस्यांनी दिले सामूहिक राजीनामे


देवळा : गुंजाळनगर ता.देवळा येथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांकडून महिला सदस्यांना शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी सरपंच यांच्याकडे बुधवार दि २६ रोजी सामूहिक राजनामा दिल्याची घटना घडली आहे.

देवळा / गुंजाळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांने अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल सामूहिक रित्या सदस्यत्वाचा राजीनामा पत्र दाखवताना शीतल गुंजाळ,स्वाती गुंजाळ, सुनील पगारे ,आशा साबळे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत सविस्तर वृत्त असे की ‘ गुंजाळनगर ता.देवळा येथील जिल्हा परिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेवर पाण्याचे वितरण करणारा एकमेव कर्मचारी असून सदरचा कर्मचारी पाणी असतानाही गावात चार ते पाच दिवस नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवतो व आपल्या मनमानी पनाने मनात येईल तेव्हा पाण्याचे वितरण करीत असतो. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात पर्यायाने त्यांना देवळा येथून पिण्याचे पाणी आणावे लागते.

यामुळे येथील संतप्त नागरिकांनी सरपंचांना धारेवर धरले असता (दि.२४) रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदर कर्मचारी परशराम सोनवणे यास विचारणा केली असता त्याने सरपंच , सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे व अपमानास्पद वागणूक दिली . तसेच महिला सदस्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने ,शीतल गुंजाळ ,स्वाती गुंजाळ ,आशाबाई साबळे ,तुषार गुंजाळ ,सुनील पगारे यांनी सांगितले असून, त्यांनी दि २६ रोजी सरपंच शरद गायकवाड यांच्याकडे सामूहिकराजीनामा पत्र सादर केले आहे. त्याच्या प्रति सरपंच ,ग्रामविस्तार अधिकारी ,पंचायत समिती देवळा ,तहसीलदार देवळा यांना पाठविण्यात आल्या आहेत.

या घटनेनंतर ग्रामपंचायत कर्मचारी परशराम सोनवणे याने रागाच्या भरात ग्रामपंचायत कार्यालयात कीटकनाशक औषध सेवन केल्याची घटना घडली .याची माहिती उपसरपंच विनोद आहेर यांना समजताच त्यांनी सोनवणे याला देवळा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ त्याला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती डॉ निलेश पवार यांनी दिली .या घटनेमुळे गुंजाळवाडी गावात खळबळ उडाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!