Skip to content

कारगिल दिनानिमित्ताने देवळा बाजार समितीच्या वतीने आजी माजी सैनिकांचा सत्कार


देवळा : कारगील दिनाचे औचित्य साधून आजी माजी सैनिकांच्या हस्ते येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दि २६ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. व आजी माजी सैनीकांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला . देवळा बाजार समितीच्या वतीने कारगिल दिन साजरा करण्यात आला .

देवळा / कारगिल दिनानिमित्ताने बाजार समितीच्या वतीने वृक्षारोपण करताना आजी माजी सैनिक समवेत सभापती योगेश आहेर ,गटनेते संजय आहेर ,संचालक भाऊसाहेब पगार आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यावेळी आजी माजी सैनिक मांगु लोखण्डे , कैलास पगार ,पंडित आहेर ,रोषण आहेर , महेंद्र आहेर , संदीप आहेर , प्रवीण बोरसे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती योगेश आहेर , गटनेते संजय आहेर . सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील आदींसह संचालक भाऊसाहेब पगार , विजय सोनवणे ,शाहू शिरसाठ , काकाजी शिंदे ,अभिजित निकम , अनिल आहेर , नगरसेवक संतोष शिंदे , सचिन सूर्यवंशी , दिलीप आहेर , राजेंद्र आहेर , सचिव माणिक निकम व शेतकरी ,कर्मचारी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!