Deola avkali: देवळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान

0
1
देवळा / विठेवाडी येथे अवकाळी पावसामुळे शेतकरी दादाजी निकम यांच्या शेतातील भूईसपाट झालेले गव्हाचे पीक ( छाया -सोमनाथ जगताप )

Deola Avkali : देवळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले असून , विठेवाडी शिवारीतिल प्रगतीशील शेतकरी दादाजी शंकर निकम यांच्या शेतातील गट नंबर १३७ व १३८ मधिल काढणीला आलेला उभा गहु अवकाळी पाऊस व वादळात सापडलेल्यामुळे पुर्ण भूईसपाट झाला, यामुळे अंदाजे पाच एकर गहु पीक पुर्ण खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . (Deola Avkali)

देवळा / विठेवाडी येथे अवकाळी पावसामुळे शेतकरी दादाजी निकम यांच्या शेतातील भूईसपाट झालेले गव्हाचे पीक ( छाया -सोमनाथ जगताप )

या नुकसानीची सोमवार (२०) रोजी क्रुषी विभागाचे कर्मचारी इंगळे यांनी प्रत्यक्ष बांधावर येवुन पहाणी केली आहे. महसुल विभागाचे कर्मचारी मात्र अद्याप फिरकले नाहीत , शासकिय कर्मचारी संपामुळे वेळेवर न आल्याने पंचनामे रखडले होते, झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचणामा करुन आर्थिक मदत मिळवून द्यावी ,अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी दादाजी शंकर निकम यांनी केली आहे. (Deola Avkali)

दरम्यान , देवळा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतिमालाचे नुकसान झाले असून , तालुक्यातील विठेवाडी ,भउर , सावकी व खामखेडा शिवारात झालेल्या बेमोसमी पावसाने गहु हरबरा, बियाण्यांसाठी लावलेल्या डोंगळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, विठेवाडी येथिल शेतकऱ्यांचे शेकडो एकर क्षेत्रावरील गहु व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे, काढनिला आलेला गहु पुर्णपणे भुईसपाट झाला आहे,सतत दोन तीन दिवस पडलेल्या पावसाने उभा गहु आडवा झाला असुन क्रुषी व महुसुल विभागाचे तात्काळ दखल घेऊन पंचनाने करावेत .

…. तर मी राजकारणातून संन्यास घेईल; भुसेंनी राऊतांना खडसावले

तालुक्यातील विविध गावांमध्ये शेकडो एकर कांदा, गहु, हरभरा, पपई इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडा असून , सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here