विश्वनाथ आहेर यांचे अपघाती निधन

0
8

देवळा : देवळा -कळवण मार्गावर श्री स्वामी समर्थ नगर नजीक गुरुवारी (दि १८) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार विश्वनाथ भागा आहेर ( ६२) रा देवळा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला . या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघात दाखल आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की , गुरुवारी दिनांक( १८) रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास देवळा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ भागा आहेर ( ६२) हे आपल्या दुचाकी एक्टिव्हा क्रमांक एम एच ४१ यू १२९७ ने देवळा कळवण रोडवरील स्वामी समर्थ नगर मध्ये एका घरगुती कार्यक्रम स्थळी पत्नीला सोडून घरी येत असताना त्यांना मागून देवळ्याच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिली .

यात आहेर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन फरार असून, देवळा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विश्वनाथ आहेर यांच्यावर शुक्रवारी दि १९ रोजी दुपारी११ वाजता देवळा अमरधाम मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

आहेर यांच्या पश्चात दोन भाऊ ,पत्नी ,एक मुलगा ,दोन मुली ,नातवंडे असा परिवार आहे . रामराव आहेर पतसंस्थेचे संचालक सुधाकर आहेर यांचे चुलत भाऊ तर पवन आहेर यांचे ते वडील होत . दरम्यान ,देवळा कळवण या वघई राज्य मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असून,या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत. तसेच सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर असल्याने वाहनांची सतत रेलचेल असते . देवळा शहर तसेच या मार्गावरील उपनगरातील नागरिक सकाळ संध्याकाळ फिरायला जात असतात . वाढत्या रहदारीमुळे त्यांना देखील जीव मुठीत धरून रस्ता मार्गक्रमण करावा लागतो. यासाठी या परिसरात गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, शहर अध्यक्ष संतोष शिंदे ,संदीप पाटील यांनी केली आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here