demonetisation : गडचिरोली पोलिसांनी जप्त केल्या 27 लाख रुपये किंमतीच्या 2 हजारांच्या नोटा…

0
40

demonetisation : भारत सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२३ नंतर २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सध्या २ हजार रुपयांच्या च्या नोटा बँकेतून बदलून घेत आहेत. यासाठी बँकेत गर्दी देखील होत असल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी आहे. मात्र दुसरीकडे आपल्याकडे असलेले अतिरिक्त पैसे बदलून घेण्यासाठी बऱ्याच लोकांकडून अवैध मार्ग अवलंबले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर गडचिरोलीत माओवाद्यांनी बेकायदेशीर रित्या जमवलेले पैसे लोकांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या ठिकाणाहुन बदलवुन घेतले जात असल्याच समोर आलं आहे. ब-याच ठिकाणी माओवाद्यांच्या या रक्कमा जप्त केल्या गेल्या असतांनाच पुन्हा अशीच एक कारवाई गडचिरोली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार करण्यात आली आहे.

 

बुधवारी दुपारी 2 वाजता गडचिरोलीच्या अहेरी येथील विशेष अभियान पथकाच्या नाकेबंदीत दोघा संशयित इसमाकडून 27 लाख 62 हजार रुपये किंमतीच्या बेकायदेशीर नोटा मिळून आल्या आहेत. demonetisation याप्रकरणी रोहित मंगु कोरसा (राहणार धोंडूर तालुका, एटापल्ली) तर दुसरा आरोपी बिप्लव गीतिष सिकदार (राहणार, पानावर,जिल्हा-कांकेर छत्तीसगड) राज्यातील आहे. हे दोघेही संशयित मोटार सायकलने जात असतांना पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान त्यांची झाडाझडती घेण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली आहेत.

दरम्यान एवढ्या मोठ्या रक्कमेबाबत पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांना उत्तर न देता आल्याने पोलिसांचा संशय बळकावला आणि पोलिसांनी या दोघंही आरोपीना अटक केली आहे.

या दोन्ही इसमावर यूपीए ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर नोटा त्यांच्याकडे आल्या कुठून, ह्या नोटा घेऊन हे आरोपी कुठे जात होते यांसारख्या गोष्टींचा demonetisation पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे.

 

याआधी देखील जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली होती. त्यावेळी देशात मोठ्या प्रमाणावर अवैध पैसा ठिकठिकाणी सापडून आला होता. अचानकपणे करण्यात आलेल्या या नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. यात बँकांमध्ये तुफान गर्दी झाल्याने काहीजणांना अस्वस्थता जाणवली होती, demonetisation तर काही जणांचा जीवही गेल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच नुकताच जाहीर करण्यात आल आहे. यामुळे सर्वसामान्यांकडून या नोटा बँकेतून बदलून घेतल्या जात आहेत. मात्र अवैध पद्धतीने गोळा केलेल्या नोटा बदलण्यासाठी खटाटोप केला जात असल्याचं या घटनेमधून अधोरेखित होत आहे. demonetisation


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here