Nashik पेठ (प्रतिनिधी) – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे पेठ नगरपंचायत नगराध्यक्ष यांना अपात्र करण्याचे मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.
Political : आरोपी झाले मंत्री ; न्याय देणार तरी कसा?
पेठ शहरातील स्मारकजवळ असलेल्या हॉटेल तसेच बारला स्थानिकांचा विरोध आहे मात्र असे असतानाही पेठ नगरपंचायतचे नगराध्यक्ष करण करवंदे तसेच तत्कालीन मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी संविधानिक पदाचा गैरवापर केला आणि त्यांनी ना हरकत दाखला दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.त्यामुळे नगराध्यक्ष करण करवंदे यांना अपात्र व तत्कालीन मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांचे निलंबन करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सोपवली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हरेश शिरसाठ यांनी हॉटेल अनुद्यप्ती कक्षपुष्पासाठी ना हरकत दाखला मिळणे कमी अर्ज केलेला नसतानाही नगराध्यक्ष करण करवंदे व मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांनी संविधानिक पदाचा गैरवापर करून हॉटेल अनुद्यप्ती पुष्पा करण्यासाठी अटी व शर्ती अधीन राहून ना हरकत दाखला ऑक्टोबर 2022 मध्ये देण्यात आला होता.
NCP Crisis: नाशिकमध्ये पवार भुजबळ आज आमने सामने
हे प्रकरण समोर आल्यानंतर नगराध्यक्षांनी एप्रिल 2023 मध्ये राज उत्पादन शुल्क विभागाकडे ना हरकत दाखला रद्द करण्याचा खुलासा केला विविध समस्या सोडवण्यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची संविधानिक नियुक्ती केलेली असते यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने नगराध्यक्षसह मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळात झालेल्या कामकाजाची चौकशी करून तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना देण्यात आले आहे यावेळी आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, प्रदेश युवा अध्यक्ष गणेश गवळी, आकाश घोडे ,सोमनाथ खोटरे, रामेश्वर भोये ,बिरसा ढोरे ,खंडू बेंडकोळी आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम