Delhi School Bomb Blast | ५० शाळांना धमकीचे मेल; अर्ध्या तासात सर्व शाळा रिकाम्या

0
31
Delhi School Bomb Blast
Delhi School Bomb Blast

Delhi School Bomb Blast |  राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राजधानी दिल्ली आणि नोएडा येथील एक दोन नव्हे तर तब्बल 80 हून अधिक शाळांना धमकीचे मेल आल आहेत. या शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्याल्याचा ई-मेल आल्यामुळे राजधानी दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. यात दिल्लीतील हायप्रोफाईल शाळांचा समावेश असून, यामुळे हादरलेल्या शाळा प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवत शाळा या अर्ध्या तासातच रिकाम्या केल्या आहेत.(Delhi School Bomb Blast)

आज पहाटेच्या सुमारास हे ई-मेल या शाळांना आले आहेत. दरम्यान, या प्रकारानंतर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना ताबडतोब घरी पाठवत शाळा रिकाम्या केल्या आहेत. तर, दिल्ली पोलिस, अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक पथकांचे अधिकारी हे मेल आलेल्या सर्व शाळांमध्ये जाऊन तपासणी करत आहेत. या परिस्थितीत अजिबात घाबरून जाऊ नका, असे आवाहन दिल्ली पोलिसांनी शाळा प्रशासनाला आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना केले आहे. या प्रकरणामुळे बुधवारी सकाळपासूनच दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. तर, शाळा प्रशासनाने पालकांना फोन फिरवत आपल्या मुलांना “लवकर घरी घेऊन जा” असे फोन केल्याने पालकही घाबरले आणि त्यांचीही धावपळ झाली आहे.(Delhi School Bomb Blast)

IIT Delhi | आयआयटी दिल्लीच्या वसतिगृहात नाशिकच्या तरुणाची आत्महत्या

अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही 

या प्रकरणावर केंद्रीय गृह मंत्रालयाचेही लक्ष असून, हा ई-मेल कोणत्या आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला आहे. याबाबत सायबर टीमकडून चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत असून,  आतापर्यंत पोलिसांना याबाबत कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. बॉम्ब निकामी करणाऱ्या यंत्रणा, बॉम्बशोधक पथक या सर्व शाळांच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत.(Delhi School Bomb Blast)

Delhi School Bomb Blast | हा एक फसवा मेल असू शकतो.. 

दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे मेल आल्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे. हा एक फसवा मेल असू शकतो. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सुरक्षेची सर्व पावले उचलत आहेत. या सर्व शाळांच्या परिसरात कसून तपास करा आणि गुन्हेगारांची लवकरात लवकर ओळख पटवा. कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका, असे निर्देश दिल्लीच्या राज्यपालांनी दिले आहेत.

Human Fregments in Delhi : दिल्लीत पुन्हा आढळले मानवी शरीराचे तुकडे

धमकीचा ईमेल देशाबाहेरून पाठवला गेला

ईमेलच्या आयपी ॲड्रेसवरून हा धमकीचा ईमेल देशाबाहेरून पाठवला गेला असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाचा तपास पोळी करता आहेत. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने हा एकच मेल एकावेळी अनेक खासगी आणि सरकारी संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले असूनल, याप्रकरणी आत्तापर्यंत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. हे धमकीचे मेल असले तरीही त्या धमकीत काहीही तथ्य नाही, घाबरण्याचे काहीच कारण नाही(Delhi School Bomb Blast)

या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. एका अज्ञात व्यक्तीने खोडसाळ भावनेतून हे कृत्य केले आहे, असेही या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे. आत्तापर्यंत कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आलेली नाही. या धमकीचे मेल आले असले तरी त्या धमकीत काहीही तथ्य नाही, घाबरण्याचे काहीच कारण नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here