स्पाईसजेटच्या दिल्ली-नाशिक विमानात तांत्रिक बिघाड; अर्ध्यातूनच परतले विमान

0
31
air

नाशिक – स्पाईसजेटच्या दिल्ली-नाशिक विमानातील ऑटो पायलट यंत्रणेत बिघाड झाली. विमानात बिघाड झाल्यानंतर दिल्लीहून नाशिकच्या दिशेने उड्डाण घेतलेले स्पाईसजेटचे विमान अर्ध्यातूनच परतले.

स्पाईसजेटच्या SG-8363 या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन नाशिकच्या दिशेने सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी उड्डाण केले. हे विमान ओझर विमानतळावर उतरणार होते. मात्र विमानाच्या ऑटो-पायलट यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे हे विमान अर्ध्या हवाई मार्गातूनच पुन्हा दिल्ली विमानतळावर वळवण्यात आले, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.

“१ सप्टेंबरला स्पाईसजेटच्या दिल्ली-नाशिक (SG-8363) विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर हे विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या परवानगीनंतर दिल्ली विमानतळावर विमानाचे यशस्वी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले”, अशी माहिती स्पाईसजेटच्या प्रवक्त्याकडून दिली गेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here