Trambakeshwar : कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर ; या दिवशी होणार शाही स्नान….

0
57

 

Nashik : कांद्याची पंढरी, द्राक्षांच माहेरघर, मंदिरांचे शहर, बेस्ट क्लाइमेट सिटी, आणि महत्त्वाचं म्हणजे कुंभनगरी म्हणून नाशिक जिल्ह्याला फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्राप्त आहे प्रत्येक बारा वर्षानंतर याच नाशिकमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून साधुसंत कुंभमेळ्यासाठी दाखल होत असतात. दोन वर्षानंतर होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा होत असतो. यातील त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्याच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.

अशी असणार त्र्यंबकेश्वर येथील २०२७ ची रूपरेषा

त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ ला सिंहस्थ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर पहिल शाही स्नान हे २ ऑगस्ट २०२७ ला राहणार आहे ३१ ऑगस्ट २०२७ रोजी तृतीय शाही स्नान तर १२ ऑक्टोबर २०२७ ला तिसर शाही स्नान होणार असून २८ सप्टेंबर २०२८ ला या कुंभ पर्वाचा समारोप करण्यात येणार आहे.

तब्बल बारा वर्षांनंतर हा कुंभमेळा भरत असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक भक्त आणि साधू महंत नाशिक नगरीमध्ये दाखल होत असतात याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून देखील युद्धपातळीवर तयारी करण्यात येते.  नाशिक जिल्हा थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन होत असतो. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील शाही स्नानाच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी मात्र नाशिक मधील कुंभमेळ्याच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या बाकी असून या तारखांकडे आता भाविक भक्तांचे लक्ष लागलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here