राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
डांग्या सुळका एक मानसिक आव्हान हे २६ जानेवारी २०२३ भारतीय प्रजासत्ताक दिनी नेचर हंन्ट एडवेंचर (Nature Hunt Adventure) संस्थापक रवी झडे यांनी पूर्ण केली आहे. तसेच त्यांच्या टिम सोबत वैभव आवळे , निलेश माने आणि अमित चव्हाण यांनी नाशिक जिल्ह्यातील दहेगाव येथील कठीण श्रेणीतील २३० फुट उंच डांग्या सुळका सर करण्याची मोहीम प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेली होती.
या मोहिमेत दहेगाव येथील – (Nature Hunt Adventure ) टिंमने २६ जानेवारी डांग्या सुळका मोहीममध्ये यशस्वी चढाई करत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या अनोख्या विक्रमामुळे रवी झडे व त्यांच्या टीम च्या या नवीन विक्रमाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे. गिर्यारोहक रवींद्र झडे व त्यांचे मित्र वैभव, निलेश, अमित या मित्रांनी त्यांच्यासोबत दाखवलेल्या साहसी आणि धाडसीपणा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या मोहिमेत अवघड चढाई करतांना वैभव ऐवळे यांनी चढण्यापासुन ते मोहिम पुर्ण समिट होई पर्यंत सर्व टीम ला सहकार्य केले. तसेच निलेश आणि अमित स्टेशन १ ते ३ पासून दोरीच्या सह्याने वरती आले होते.
रवी झडे स्टेशन ३ वरुन ४ वर जात आसताने वैभव ऐवळे त्यांना बिले देत होता आणि त्यांच्या या मोहिमेत अनेक वेळा चढाई करत असतांना दगड पडत असे पण य सर्व टीम ने धिर सोडला नाहीं अश्या खडतर जीवघेण्या परिस्थितीत चढाई करायची म्हणजे करायची असं सर्वांनी ठरवलं होतं अश्या परिस्थितीत गिर्यारोहक वैभव नेहमी म्हणायचा रवी तु पुढे हो मी आहे पाठीमागे असं करत करत डांग्या सुळका सर्वांनी सर केला.
Team,
Nature Hunt Adventure
1) Ravi zade – Lead climber ( certified mountaineer experts guide
2) vaibhav Aiwale- International Mountaineer ( आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक – गिनिज रेकॉर्ड होल्डर)
3) Nilesh Mane – climbers
4) Amit Chavhan – Climbers
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम