सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीपणे उभे – मंत्री दादाजी भुसे

0
11
वाजगाव ता.देवळा : येथील शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ करताना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे,आमदार दिलीप बनकर, केवळअण्णा देवरे, डॉ.व्ही.एम.निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप )

Dada bhuse : अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. बुधवार (दि .२२) रोजी वाजगाव ता.देवळा येथील शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. (Dada bhuse)

वाजगाव तादेवळा येथील शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ करताना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसेआमदार दिलीप बनकर केवळअण्णा देवरे डॉव्हीएमनिकम आदी छाया सोमनाथ जगताप

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बनकर हे होते. पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले की, शेती करत असताना नवनवीन पर्याय शोधत व्यावसायिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यायला हवे. शेतकरी कुटुंबातील महिलांना सन्मान देत त्यांचेही नाव सातबाऱ्यावर यायला हवे. यामुळे योजनांचा लाभ घ्यायला सोपे जाते. कांदा या नगदी पिकावर शेतकऱ्यांचा जास्त भर असल्याने कांद्याबाबत दीर्घकालीन नियोजन व धोरण आखण्यासाठी शासनपातळीवर समिती गठीत करण्यात आलेली आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते फीत कापत व बैलजोडीचे पूजन करत शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

Nifad kisan: केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याने उभारली द्राक्षे, लसूण व कांद्याची गुढी

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे ठरलेले या कृषी पर्यटन केंद्राची चित्रफीत दाखवत येथे पर्यटकांसाठी कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत त्यांची माहिती देण्यात आली. या केंद्राच्या संचालिका अंजना केवळ देवरे व पद्मा बाळासाहेब देवरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील यांनी कृषी व शैक्षणिक सहलींचे हे पर्यटन केंद्र पुढील काळात नवा आयाम घेईल असे सांगितले तर द्वारकाधीश साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत यांनी ऊस व साखर कारखानदारी याबाबत सांगत शेतीला पर्याय शोधण्याचे आवाहन केले. मविप्रचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे आपल्या मनोगतात म्हणाले की, शेतकरी, विद्यार्थी आणि पर्यटक अशा सर्वच घटकांसाठी हे केंद्र लाभदायी असून शेती आणि शिक्षण यांची सांगड यातून घातली जावी. यावेळी मालेगाव येथील साई कारचे संचालक नारायण सूर्यवंशी, नाशिक जिल्हा बँकेचे माजी संचालक यशवंत आहिरे, मविप्रचे माजी संचालक अशोकराव पवार, के.एन.आहिरे, मालेगाव बाजार समितीचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, मालेगाव मनपाचे माजी नगरसेवक सतीश सुराणा, डॉ.यतीन कापडणीस, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख, तहसीलदार विजय सूर्यवंशी, कैलास पवार, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक समीर बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात दिलीप बनकर यांनी सांगितले की, शहरातील मंडळी यामुळे पुन्हा खेड्यांकडे येतील आणि ग्रामीण अर्थकारणाला बळ मिळेल. एकत्र कुटुंबपद्धतीने विकासाला चालना मिळते. मविप्रचे माजी संचालक डॉ.व्ही.एम.निकम यांनी निसर्ग व शेती यांचा आनंदानुभव घेण्यासाठी इथे येण्याचे आवाहन करत आभारप्रदर्शन केले. केवळ देवरे, बापूसाहेब देवरे, बाळासाहेब देवरे, शिवाजी देवरे, संजय देवरे, राजाराम देवरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here