Dada bhuse V raut: कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या वर गिरना अॅग्रो कंपनीत भ्रष्टाचार झाल्या बद्द्ल संजय राऊत यांनी ट्विट करत आरोप केला आहे. यावरून राजकीय विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला असून यावरून राजकिय क्षेत्रात चांगलेच वादळ उठले आहे. दादा भुसे यांनी आज विधानसभेत या आरोपांना सडेतोड उत्तरं दिले आहे. जर मी दोषी असेल असं वाटतं तर जगातली कोणतीही साधन लावून माझ्या आरोपांची चौकशी करा. जर मी दोषी ठरलो तर राजीनामा देईन. पण आरोप खोटे निघाले तर महागद्दार संजय राऊत यांनी राजीनामा द्यावे लागेल , असं दादा भुसे यांनी सांगितले आहे. संजय राऊत हे मातोश्रीची चाकरी करतात अन् राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची चाकरी करतात, असा गंभीर आरोप दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. (Dada bhuseDada bhuse V raut)
Milk Benefits: दूध प्यायल्याने अॅसिडिटी तयार होते किंवा दूर होते, जाणून घ्या…
दादा भुसे काय म्हणाले?
शिवसेना नेते दादा भुसे यांनी आज संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, हे आरोप खरे ठरले तर मी, मंत्रीपद सोडेन, राजकारणाचा त्याग करेल. तुम्ही लोक आम्हाला गद्दार म्हणतात. पण आमच्याच मतावर हे गद्दार निवडून आले आहेत. पण ते खोटे ठरले तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा त्याग करावा. दैनिक सामनाच्या संपादक पदाचा पण त्याग करावा असे आवाहन भुसेंनी केली आहे.
चाकरी मातोश्रीची…
हे भाकरी मातोश्रीची खातात पण चाकरी राष्ट्रवादीची, करतात, असा आरोप दादा भुसे यांनी केलाय. यानंतर विधानसभेत एकच वादळ उठले . संजय राऊत यांनी मालेगावच्या नागरिकांची माफी मागावी. संजय राऊत यांनी येत्या २६ तारखेपर्यंत मालेगावच्या लोकांची माफी मागावी नाही , तर शिवसैनिक गद्दारांना त्याची जागा दाखवावी लागेल , असा इशारा मंत्री दादा भुसे यांनी दिला.
अजित पवारांचं उत्तर काय?
दादा भुसे यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी सभागृहातच प्रतिउत्तर दिलंय. शरद पवार यांचं नाव सभागृहात घेण्याचं काही कारण नव्हतं असं अजित पवारांनी विधानसभेत सांगितले. यावेळी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे व राष्ट्रवादीने नेते अजित पवार यांच्यात मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक देखील यावेळी बघायला मिळाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम