Dada Bhuse | शिवजयंतीसाठी मंडप शुल्क माफीचे पालकमंत्र्यांचे निर्देश

0
29
Dada Bhuse
Dada Bhuse

Dada Bhuse |  अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, या उत्सवाच्या आयोजकांकडून नशिक महानगरपालिकातर्फे जाहिरात शुल्क आकारले जातात. दरम्यान, हे जाहिरात शुल्क माफ करण्यात यावे यासाठी युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना पत्रव्यवहार करत आपली मागणी मांडली असता, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावर्षीचे जाहिरात शुल्क माफ करण्याचे निर्देश दिलेले आहेत.(Dada Bhuse)

येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असून, यासाठी शहरात तरुणाईचा मोठा जल्लोष असतो. महिनाभर आधीपासूनच या उत्सवांची तयारी केली जाते. त्यानुसार, तमाम शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे आणि युवासेना महानगरप्रमुख योगेश बेलदार, तसेच रविवार पेठ शिवजन्मोत्सव आयोजन समितीचे सचिन भोसले आणि पदाकाधिऱ्यांनी पत्राद्वारे शुल्कमाफीची मागणी केली होती. त्यांची ही मागणी पालकमंत्र्यांनी मान्य केली असून, तातडीने त्याबाबतचे आदेश दिले.

Dada Bhuse | कुणी गल्लीत विचारत नाही अन् बाता मात्र…; भुसेंनी राऊतांना फटकारले

हे दोन्ही उत्सव मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जागेवरती साजरा केले जातात. दरम्यान, ज्या शिवजन्मोत्सव मंडळांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांच्याकडून जागेचे भाडे हे महानगरपालिका प्रशासन आकारत असते. तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा महात्मा फुले या महापुरुषांच्या जयंती उत्सवांच्या निमित्ताने मंडप आणि जाहिरात शुल्क माफ करण्यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विनंती करण्यात आली होती. या विनंतीला मान देऊन, दादाजी भुसे यांनी आदेश दिले असून, याबाबत शिवजयंती उत्सवाच्या आयोजकांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांचे आभार मानले आहेत. (Dada Bhuse)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here