Dada Bhuse | महायुतीचे मालेगाव बाह्य मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ आज करंजगव्हाण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना भुसे यांनी विकासकामांचा पाढा वाचून दाखवत जनतेला संबोधित केले. “मालेगावातील ज्या विद्यार्थ्यांना कृषी विषयक शिक्षण घ्यायचे असेल त्यांना आता बाहेरगावी जावे लागणार नाही. कारण आपल्या मालेगावचे भाग्य एवढे मोठे की, एकाच ठिकाणी सुरू असलेले पाच कृषी महाविद्यालय आणि एक डिप्लोमा कॉलेज हे आपल्या मालेगावात आहे. या मालेगावच्या विकासाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल. त्यात प्रमुख भूमिका ही या कृषी पंढरीची असणार आहे. मोठमोठ्या शहरात खाजगी हॉस्पिटल नसेल असं मॉड्युलर हॉस्पिटल आपल्या महिला भगिनींच्या सेवेत रुजू झाले आहे. एका महिलेच्या डिलिवरीसाठी 50 हजारापर्यंत खर्च येतो. आपल्या महिला बाल रुग्णालयात एक रुपयाही लागत नाही.”
Dada Bhuse | साहेबांनी आमच्या डोक्यावरचे हंडे उतरवले…; लाडक्या बहिणी ‘दादा भाऊंसोबत’
“विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले”
नाशिक जिल्ह्याला ८५० कोटी मालेगाव तालुक्याला १६४ कोटी रुपयांच्या पीक विम्याचा निधी वितरित झाला. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ७१,००० लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे. मालेगाव तालुक्यात २ लाख २५ हजार बहिणींचा लाडकी बहिण योजनेचा सन्मान निधी वर्ग झाला आहे. विरोधक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. मी न्यायालयाचा आभारी आहे. योजना बंद केली नाही. उलट योजनेचं अभिनंदनही केलं आणि आता लाडक्या बहिणींसाठीही एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा निधी हा १५०० वरून २१०० रुपये करण्यात येणार आहे.
धुळे येथे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे. मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी आपल्या सरकारने ३००० घरं मंजूर केली आहे. आता आपल्या तालुक्यातील एकही आदिवासी बांधव पाचटच्या घरात राहणार नाही. नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पासाठी ७,५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि याअंतर्गत १ लाख २५ हजार क्षेत्राला १० टीएमसी इतके पाणी उपलब्ध होणार आहे.
Dada Bhuse | जनता यांचे रडीचे डाव जाणते, ते यांना भीक घालणार नाही; भुसेंचे विरोधकांवर शरसंधान
विरोधकांच्या टिकांना दिले प्रत्युत्तर
यावेळी बोलताना भुसे यांनी विरोधकांच्या टीकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “एक म्हणतो दादा भुसेचा दुबई, गोव्यात बंगला आहे. त्यांना दहा वाजेनंतर फक्त गोवा आणि दुबईच दिसते. दुसरा भाऊ म्हणतो मला काय दिलं आणि तुला काय दिलं. अशा पद्धतीने प्रचार केला जातोय. खालच्या पातळीवर जाऊन आरे कारेची भाषा वापरली जातेय. दोन तीन वर्षांपर्यंत तुम्ही दादा भुसेचे गाणे म्हणायचे आणि आता अचानक असं काय झालं की दादा भुसे वाईट झाल. या दोघांची कुस्ती सुरु आहे. एकाने दुसऱ्याला स्पॉन्सर करून उभं केलं आहे. दादा भूसेचं मत खायला. दादा भुसेला भेटायला कोणाचीही चिठ्ठी लागत नाही. सकाळी आठ वाजेपासून आपलं काम सुरू होतं. मी विनंती करतो आपण सर्वांनी मिळून आपल्या मालेगावचे नाव मोठे केले आहे. काही लोकांना मालेगावमध्ये अशांतता पसरवायची आहे. गुंडगिरी आणायची आहे आणि आपण हे होऊ देत नाही. गावोगावी महिला भगिनी आमचे औक्षण करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा धनुष्य बाणाचा विजय होईल आणि महायुतीचे सरकार येईल,” असा विश्वास यावेळी भुसे यांनी व्यक्त केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम