Dada Bhuse | ‘या’ तारखेपर्यंत लाडकी बहिणीचे अर्ज भरता येणार; दादा भुसेंचे महिलांना आवाहन

0
116
Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

Dada Bhuse | महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा सध्या राज्यात बोलबाला सुरू आहे. तीन हप्ते आल्यामुळं महिलांमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. या योजनेत सुरुवातीला अर्ज दाखल करण्याची 31 ऑगस्ट तारीख होती. परंतु महिलांच्या वाढता प्रतिसादामुळं अर्ज दाखल करण्याची तारीख 31 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, या मुदतीतही अनेक महिलांनी काही कारणामुळं अर्ज दाखल केले नव्हते. पण अशा महिलांना आता अर्ज (Application) दाखल करण्यासाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

Dada Bhuse | मालेगावातील आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळणार; दादा भूसेंच्या पाठपुराव्याला यश

संपूर्ण कागदपत्रे असलेल्या महिलांना अर्ज करता येणार

या योजनेतील ऑगस्ट महिन्यात दोन हप्ते मिळाले आहेत. तर 29 सप्टेंबरपासून तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पण ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते. ज्या महिलांचे आधार कार्ड नव्हते किंवा अन्य कागदपत्रं नव्हती, अशा महिलांनी या योजनेचा अर्ज दाखल केला नव्हता. परंतु आता या महिलांनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलं आहे. अन्य कागदपत्रे जमवली आहेत अशा महिलांना नवीन अर्ज दाखल करता येणार आहेत. मुदत वाढल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Dada Bhuse | मालेगाव येथे अपर तहसील कार्यालयास मंजुरी; मंत्री दादाजी भुसेंची माहिती, शासन निर्णय निर्गमित

दादा भुसे यांचे महिलांना आवाहन

नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेत सहभाग घेतला असून ज्या महिला या योजनेपासून वंचित आहेत, अशा महिलांनी आपले कागदपत्र अपलोड करून नाव नोंदविण्याचे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. या निर्णयामुळे महिला वर्गाला फायदा होणार असून पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुदत वाढीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here