Dada Bhuse | मतदान प्रक्रिया संपताच भुसे जनतेच्या सेवेत हजर; तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले

0
3
#image_title

Dada Bhuse | आज राज्यासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर महायुतीचे मालेगाव बाह्य मतदारसंघातील अधिकृत उमेदवार दादा भुसे यांनी मतदारांचे, महायुती शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी दादाजी भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. याप्रसंगी भुसे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यादरम्यान मतदारसंघात एक अपघात झाल्याची माहिती समजताच ते सभा आटोपून तातडीने रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.

Dada Bhuse | लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा धनुष्य बाणाचा विजय होईल व महायुतीचे सरकार येईल; भुसेंना विश्वास

सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे मानले आभार

यावेळी बोलताना भुसे म्हणाले, आज पार पडलेल्या मतदानास आपल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मतदान शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नवमतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. या प्रचार काळात जनतेने माझ्यावर दाखवलेला प्रेम, विश्वास यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. याकाळात शिवसेना, महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. अत्यंत परिश्रम घेतले. त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे, असे म्हणत सर्व मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार यावेळी दादा भुसे यांनी मानले.

Dada Bhuse | साहेबांनी आमच्या डोक्यावरचे हंडे उतरवले…; लाडक्या बहिणी ‘दादा भाऊंसोबत’

पुन्हा एकदा युतीचे सरकार आल्यावर सेवेत रुजू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला

तसेच या धावपळीच्या काळात जर कुणाचे मन दुखावले गेले असेल. अनेक वक्ते प्रचारादरम्यान पुढे आले. मात्र वेळेअभावी प्रत्येकाला संधी मिळू शकली नाही. त्याबाबत सर्वांची माफीही त्यांनी मागितली. प्रचाराची पातळी खालावण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, आपण आपली पातळी खालावू दिली नाही. याबद्दल सर्वांचे कौतुकही केले. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येणार असून त्यानंतर पुन्हा एकदा जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here