Dindori | आज नाशकात ‘इतके’ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात

0
85
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी : दिंडोरी | विधानसभा निवडणूक 2024 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. नागरिकांकडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात आहेत. तर या विधानसभा निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असा सामना रंगला असून जनता कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dindori | ‘विधानसभा निवडणूक 2024 साठी आयोगाकडून जाहीर सूचनांचे कडेकोटपणे पालन करावे’ – आप्पासाहेब शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी

आज जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 60.11% मतदान झाले असून जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात 71.97% असे सर्वाधिक मतदान झाले आहे. तर नाशिक पूर्व मतदारसंघात 49.06% इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. तसेच मालेगाव मध्य मतदार संघात 61.58%, नांदगाव मतदार संघात 59.93% कळवन 70.35%, मालेगाव बाह्य 57.56%, येवला 68.69%, बागलाण 53.84%, देवळाली 55.8%, सिन्नर 63.85%, नाशिक पश्चिम 50.39%, निफाड 62.25%, नाशिक मध्य 51.49%, इगतपुरी 69.39%, चांदवड 65.1% असे एकूण 60.11% मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झाले.

या नेत्यांनी पूर्ण केले मतदानाचे कर्तव्य

तर आज जिल्ह्यातील नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

#image_title

महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुनिता चोरसकर यांनी पाडे येथे मतदान केले आहे.

#image_title

महायुतीचे अजित पवार गटाचे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी सपत्नीक वनारे येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. तर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात सुनीता चौरसकर विरुद्ध नरहरी झिरवाळ अशी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.

#image_title

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या 86 वर्षीय मातोश्रींसह मतदान केले आहे.

#image_title

म.वि.प्र. संचालक प्रवीण नाना जाधव यांनी देखील मतदान केले.

#image_title

शरद पवार गटाचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

Dindori | तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्रच्या वतीने बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here