Deola | देवळा-चांदवड मतदार संघात मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न; मतदानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
9
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात आज बुधवार (दि.२०) रोजी झालेल्या निवडणुकीत देवळा तालुक्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान झाले. १ लाख १९ हजार ६१६ पैकी ८२ हजार ७९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

Deola | चांदवड-देवळा मतदारसंघात ३ लाख ८ हजार ८०८ मतदार; ३०६ केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडणार

मतदार संघात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देवळा तालुक्यात सकाळी १० वाजेपर्यंत मतदारांत तसा निरुत्साह जाणवला परंतु नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा दिसून आल्या. यात महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. ज्येष्ठ मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३० टक्के, १ वाजेपर्यंत ३४.१९ तर पाच वाजेपर्यंत ६५.०१ टक्के मतदान पार पडत गेले. यात महिलांची टक्केवारी अधिक म्हणजे ६७.४२ टक्के इतकी होती. नंतरच्या एक तासात मतदानाचा वेग वाढत गेला व काही गावांमध्ये उशिरापर्यंत मतदान चालू होते.

Chandwad-Deola | अखेर राहुल दादांसाठी उदयदादा चांदवड-देवळ्याच्या मैदानात…

देवळा-चांदवड मतदार संघात चौरंगी लढत

या मतदारसंघात प्रामुख्याने भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, अपक्ष केदा आहेर, काँग्रेसचे शिरिषकुमार कोतवाल व प्रहारचे गणेश निंबाळकर यांच्यात लढत दिसून आली. देवळा तालुक्यात मात्र दोन्ही आहेर बंधूमध्ये लढत असल्याचे दिसले. अगदी खिलाडू वृत्तीने नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडणूक पार पाडली. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला. तालुक्यातील मतदान केंद्रांवर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन मतदानाची आकडेवारी जाणून घेतली. जवळपास सर्वच गावांत ज्येष्ठ मतदारांना आणत त्यांच्याकडुन मतदान करवून घेतले. वृद्ध महिला व दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरवर बसवून आणत मतदान केले. बाहेरगावी राहणाऱ्या जागरूक मतदारांनी गावी येत मतदान केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here