Surgana – सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा येथे बिबट्याने हल्ला करून 3 वर्षीचे गाईचे पिलू चावा घेतल्याने जागीच ठार झाले. चिंचपाडा येथील रहिवासी श्री संतोष रामदास पगार हा आपल्या घरी आपल्या गोठ्यामध्ये दोन बैल एक गाय व एक गाईचे वासरू रोजच पडवीत बांधत असत रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गाईच्या पिल्लाला जागीच ठार केले हि घटना रामदास पगार याना सकाळी बैल सोडायला गेला असता लक्षात आली . ह्या पिल्लावरती बिबट्याने हल्ला केला या भागात नेहमीच बिबट्याचे हल्ले होत असतात. रोजच बिबटे गावात येतात. परिसरातील गावांमध्ये अशा घटना दररोजच ऐकायला मिळत असत. कोंबडीनेने, बकरी वर हल्ला करणे ह्या घटना जवळील गावामध्ये होत असता.
तालुक्यात अशा घटना अनेक वेळा झाल्या आहेत काही महिन्यापुर्वी दोन बक-या व एक बोकड बिबट्याने फस्त केला आहे. दहा ते बारा वर्षांपुर्वी एका आठ वर्षीय मुलीला बिबट्याने अंगणातून उचलून नेले होते. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
सुरगाणा तालुका हा डोंगराळ व अतिदुर्गम, खोल दरी, जंगलव्याप्त भाग असून गुजरात सीमावर्ती डांग जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रास लगतचा आहे. या खोऱ्यात जंगल असल्याने
त्यामुळे रोजच या भागात बिबट्याचे दर्शन होते. रोजच सात ते आठ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना त्याची सवय झाली आहे. बिबट्या,तरस आदी जंगली श्वापदां शिवाय करमत नाही. काही जण वनपट्यात रहात होते ते आता भीती पोटी आपल्या जनावरांसह गावात रहायला आले आहेत.
रात्री तर रोजच कोणाला तरी गावाच्या आसपास बिबट्याचे दर्शन आम्हांला होत असते. त्यामुळे बिबट्या दिसला तर आम्हाला काही त्याचे नवल अपुरुप वाटत नाही. आम्हांला पण वन्यजीवां शिवाय करमत नाही. मात्र जिवितहानी झाली तर शासनाने नुकसान भरपाई द्यावी एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम