वाडा : गेल्या काही दिवसांपूर्वी वाडा बसस्थानक परिसरात पहाटेच्या वेळी एका वृद्धमहिलेचा मृतदेह सापडला. तेथील नागरिकांनी तडक पोलिसांना संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीची ओळख पटली.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने कोणतेही (crime) कारण नसताना ६५ वर्षिय वृद्धमहिलेची हत्या केल्याची घटना समोर आली.
या घटनेमुळे संपूर्ण वाडा शहर हादरले आहे. हा संपूर्ण प्रकार जेव्हा घडला (crime) तेव्हा बस स्थानक परिसरात कोणीही नव्हते. परंतू वाडा शहरात असलेल्या सीसीटीव्ही च्या आधारे याप्रकरणाचा उलगडा झाला.
हे सुद्धा वाचा :
चक्क..कॅरीबॅगमध्ये सहा लाखाचे दागिने होते पडून! कुठे तर वाचा सविस्तर
वाडा येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कांदिवली येथील इंदू अर्जुन वाघ ही महिला गेल्या (crime) तीन वर्षांपासून वाडा बसस्थानक परिसरात भीक मागून जगत होती.
रविवारी रात्री ती बस स्थानक परिसरातील एका आडोशाला झोपली असताना वाडा शहरातील नेहरूनगर परिसरातील अभिमन्यू सुदाम सवरा या २४ वर्षीय इसमाने अज्ञात कारणाने या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड टाकून (crime) हत्या केली. ही घटना घडली व सीसीटीव्हीमुळे आरोपीची ओळख पटल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
याबाबत मृत महिलेचा पुतण्या भगवान गोविंद वाघ यांनी वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून भादविस कलम ३०२ नुसार वाडा पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद केला आहे. सदर या गुन्ह्यातील आरोपी फरार असुन आरोपीला पकडण्याकरिता वेगवेगळे पथक तयार करून वाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव हे पुढील तपास (crime) करीत आहेत.
हे सुद्धा वाचा :
महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी 4000 हून अधिक कोरोना रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 21 हजारांवर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम