Crime news | पत्नीवर संशय आला आणि जावयाने सासुरवाडीच संपवली

0
53
Latur Crime
Latur Crime

Crime news |  पती-पत्नीच्या नात्यात विश्वास हा अत्यंत गरजेचा असतो. ह्या नात्यात जर विश्वास कमी झाला किंवा डगमगला तर, नात्याचे गणित बिघडते आणि नात्यात चुकीच्या गोष्टी घडतात. आणि एकदा की हा संशयाचा किडा घरात घुसला की, तो संसार उद्ध्वस्त करतो.(Crime news)

ह्याच संशयामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले किंवा यामुळे अनेक गुन्हे देखील घडल्याच्या घटना ह्या ऐकायला मिळतात. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली असून, ह्या घटनेत पत्नीवर संशय आल्याने पतीने पत्नीसह आणखी ४ जणांना संपवल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ह्या घटनेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने आपल्या पत्नीसह पत्नीचे वडील आणि भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची ही खळबळजनक घटना समोर आली आहे.(Crime news)

Nashik Crime | नाशकात दारूवरून फटकारल्याने भाच्याने मामाचा केला खून

दरम्यान, ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत पत्नीचे दुसरीकडे प्रेमप्रकरण सुरू असून, तिच्या चारित्र्यावर संशय घेत हा खूनी पती पत्नीला गेऊं ससारवाडीला गेला आणि सासरवाडीत जाऊन त्याने तिथे चार जणांची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ह्या आरोपी पतीने त्याची पत्नी, सासरा व त्याच्या दोन मेव्हण्यांची सासरवाडीतच निर्घृणपणे हत्या केली आहे.(Crime news)

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील तिरझडा ह्या गावात मंगळवार (दि. १९ डिसेंबर) रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान, ही दुर्दैवी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून ह्या कुटुंबातील चौघांची हत्या झाल्यामुळे येथील परिसरासह संपूर्ण तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे. या प्रकरणी, आरोपी पती विरचंद पवार याला यवतमाळ कळंब पोलीसांनी बेड्या ठोकत ताब्यात घेतले आहे. (Crime news)

Nagpur Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने एक्स गर्लफ्रेण्डला संपवलं


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here