Crime News | उत्तर प्रदेश पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजित मौर्यला लखनऊच्या सरोजिनीनगर येथील हॉटेलमधून अटक केलेली आहे. अजित मौर्य पत्नीसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होता आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात जाण्याचा प्लॅन बनवत होता मात्र त्याचा प्लान पूर्ण होऊ शकला नाही कराण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी याबाबतची संपुर्ण माहिती दिली.
Mla Disqualification | ठाकरेंनी दाखवला पुरावा अन् शिंदेंच्या अडचणी वाढणार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित मौर्यवर बनावट पॉन्झी योजना चालवल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये बनावट नोटा चलनात आणणे, विमा योजना आणि इतर अनेक फसवणुकीसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अजित मौर्य हा फक्त सहावा वर्ग शिकलेला आहे. मात्र सोशल मीडियावर त्याचे खूप फॉलोअर्स आहेत. त्याने आपल्या 2 बायका, 9 मुलं आणि 6 गर्लफ्रेंडचा उदरनिर्वाह करण्यासाठी गुन्ह्याचा मार्ग स्वीकारल्याचं त्याने पोलिसांना सांगितलेलं आहे.
सोशल मीडिया साइट्सवर रील बनवणाऱ्या अजित मौर्यला 2 बायका, 9 मुलं आणि 6 गर्लफ्रेंड आहेत. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो गुन्हेगारी जगात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. अजित मौर्यवर नऊ गुन्हे दाखल आहेत. धर्मेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने मौर्याविरुद्ध FIR दाखल केल्यानंतर पोलिसांना त्याच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली काही लोकांनी आपली 3 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्या व्यक्तीने केलेला होता.
आधी अजित मौर्य हा मुंबईत बनावट प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत बनवण्याचे काम करत होता. काम मिळणे बंद झाल्यावर त्याचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला. पोलिसांनी सांगितले की, 2000 मध्ये त्याने मुंबईतील 40 वर्षीय संगीतासोबत लग्न केले आणि तिला सात मुलं आहेत. 2010 मध्ये त्याची नोकरी गेली आणि ते गोंडा येथील त्याच्या गावी परतले पण येथेही त्याला बेरोजगारीचा सामना करावा लागला.
Good News | खवय्यांसाठी खुशखबर; देवगड हापूस आंबा बाजारात
अजित मौर्यविरुद्ध चोरी आणि अतिक्रमणाचा पहिला गुन्हा 2016 मध्ये गोंडा येथे दाखल झाला होता. दोन वर्षांनंतर तो 30 वर्षीय सुशीलाच्या संपर्कात आला आणि त्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘त्याने बनावट नोटा आणि पॉन्झीसारख्या योजनांचा प्रसार सुरू केला आणि या दोघांनी लवकरच इतर काही लोकांसोबत एक संघटना स्थापन केली. 2019 मध्ये मौर्यने सुशीलाशी लग्न केले तसेच जिच्याकडून त्याला 3 मुलं आहेत.
2019 मध्ये सुशीलासोबत लग्न झाल्यानंतर मौर्यचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. या दोघांनी मिळून गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं. पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली. तर तपासादरम्यान, अजित मौर्यने दोन घरे बांधल्याचे पोलिसांना कळालं. एका घरात संगीता राहते आणि दुसरीकडे सुशीला आणि तिची मुलं. या दोन्ही पत्नी या घरांमध्ये आरामात सर्व सुखसोयींचा उपभोग घेत आहेत. इतकेच नाही तर लोकांकडून लुटलेलं सामानही या दोघींमध्ये समान प्रमाणात विभागले जात होते. परंतु, आता अखेर अजित मौर्यला अटक करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम