नाशिक : शहरातील पंचवटी येथे एका चारचाकीची काच फोडून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपयांच्या रोख रकमेसह कागदपत्रे चोरून नेल्याची घटना जिल्हा बाजार समितीसमोर घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीमालक परीक्षित राशीकांत निकम (वय ३९, रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) यांनी बुधवारी (दि.२८) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील म्हसोबा मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या दुभाजकाला लागून त्यांची चारचाकी गाडी (एमएच १५ एचएफ ६२०४) उभी करून ठेवली होती.
दरम्यान, त्या अज्ञात चोरट्याने गाडीच्या मागील दरवाजाची काच फोडून चारचाकी गाडीत असलेली दीड लाख रुपयांची रोकड व कागदपत्रांची बॅग चोरून लांबवली आहे. या प्रकरणी निकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञातावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार एस.पी. कुलकर्णी करत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम