Crime News | नाशिक | सरकारी नोकरीत असलेल्या महिलेने गुन्हेगारीचा कळस गाठलेला आहे. आधी आजारपण, मुलांचे शिक्षण, शेती अशी कारणं सांगून नाशिकच्या दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक पीठाच्या विश्वस्त निंबा शिरसाट यांच्याकडून २५ लाख रुपये घेतण्यात आलेले आहेत. त्यानंतर मोबाईलमधील काही व्हिडिओ निंबा शिरसाट यांना दाखवले आणि त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी रुपये लुटले. या महिलेचा हा प्रकार थांबतच नव्हता. सोबत या महिलेचा मुलगादेखील होता. यामुळे शिरसाट यांनी पोलिसांत तक्रार केली होती त्यानंतर दहा लाखांची खंडणी घेताना आई आणि मुलास रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. या प्रकरणात कृषी विभागात सहायक असलेल्या सारिका सोनवणे आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे यांना अटक करण्यात आलेली आहे. (धक्कादायक)
Gold-Silver Price | आनंदवार्ता..! सोनं झालं स्वस्त, पाहा आजचे दर
नेमकं काय आहे प्रकरण?
दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक पीठाचे विश्वस्त निंबा शिरसाट आणि सारिका सोनवणे यांची २०१४ मध्ये ओळख झालेली होती. हे दोघेही नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याचे रहिवाशी आहेत. आजारपण, शेती, मुलांचे शिक्षण अशी कारणे सांगून २०२९ मध्ये सारिका सोनवणे हिने २५ लाख रुपये निंबा शिरसाट यांच्याकडून घेतले होते. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये निंबा शिरसाट यांना मोबाइलमधील काही व्हिडिओ दाखवले आणि २० कोटी रुपयांची मागणी केली गेली. वेळोवेळी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्यांनी सारिका सोनवणे यांना दिलेली आहे.
अखेर पोलिसांत दिली तक्रार…
२०१८-१९ मध्ये सारिका सोनवणे यांनी स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडूनही लाखो रुपये जमा केले होते. तसेच निंबा शिरसाट यांच्याकडून सारिका सोनवणे ही महिला सातत्याने पैशांची मागणी करत होती. यामुळे त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर सारिका सोनवणे आणि तिचा मुलगा मोहित सोनवणे यांना १० लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडीही दिलेली आहे. सारिका सोनवणे निफाड तालुक्यातील पिंप्री येथे बीजगुणन केंद्रात कृषी सहायक आहेत तर ४ ऑक्टोबरपासून त्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम