Crime News | भगव्या ध्वजाचा अपमान करणाऱ्या मुस्लिम युवकाची नग्न धिंड

0
56
Crime News
Crime News

Crime News |   सध्या तरुणाईला रील्सची भुरळ पडली आहे. रील्सवर तरुण आपल्या कलांचे व्हीडियो बनवतात. यामुळे अनेकांच्या कलांना वाव मिळतो. तर, काही रातोरात प्रसिद्ध होऊन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनतात. मात्र, आता याच रील्स बनवणे एका मुस्लिम तरुणाला महागात पडले आहे.

या घेतनेत भगव्या ध्वजाचा अपमान करणारी एक व्हीडियो इनस्टाग्रामवर अपलोड केल्यामुळे एका मुस्लिम धर्मीय तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, या रीलमध्ये संबंधित मुस्लिम तरुण हा भगव्या ध्वजाचा अपमान करत असल्याचे दिसत होते. हिंदू धर्माचे प्रतिक असलेला भगवा  ध्वज तसेच धार्मिक दृष्ट्या पवित्र असलेले ‘ओम’ हे चिन्ह ही त्या भगव्या ध्वजावर होते. या तरुणाला मारहाण करणाऱ्यांनी आरोप केले की, “हिंदूच्या भगव्या ध्वजाचा अपमान होईल, अशा पद्धतीने या तरुणाने हे रील बनवले होते.(Crime News)

Nashik Crime | नंदुरबारच्या मुलीची नाशिकमध्ये प्रियकराने केली हत्या

Crime News | नेमकं प्रकरण काय..?

टीव्ही 9 च्या  वृत्तानुसार, ही घटना तेलंगणा राज्यातील संगारेड्डी येथे घडली आहे. या घटनेत या संबंधित मुस्लिम तरुणाला मारहाण करुनच जमाव थांबला नाही. तर, यांनी त्या तरुणाची विवस्त्र करत धिंडही काढली. हा कथित व्हीडियो पाहून मेडक जिल्ह्यातील गावकरी हे संतप्त झाले आणि त्यांनी या तरुणाला शोधले व त्याला चांगलाच चोप दिला आहे. या घेटनेचाही व्हिडिओ समोर आला असून, यात हा संतप्त जमाव ‘जय श्री राम’च्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. तसेच त्या युवकाला मारहाणदेखील करत आहेत. धक्कादायक म्हणजे या तरुणाची नग्न धिंड काढून गुप्तांगाला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे यात दिसत आहे. (Crime News)

Kalyan Crime | प्रेम प्रकरणातून प्रियकरानेच केला १३ वर्षीय मुलीचा खून…!

गावकऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल 

या प्रकरणी हिंदु धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी संबंधित गावकऱ्यांनी या मुस्लिम युवकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली. कलम १५३ (अ), २९५ -अ, ५०५ (2) या अंतर्गत पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. तर, मारहाण केल्यामुळे संबंधित मुस्लिम तरुणाने देखील या गावकऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी या गावकऱ्यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम ३४१, ३२३, ५०५ (२) आणि ५०६ या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.(Crime News)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here